“फडतूस गृहमंत्री लाभलाय”, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र; म्हणाले, “लाचार, लाळघोटेपणा..”

उद्धव ठाकरे म्हणतात, “त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये.

maharashtra-cm-eknath-shinde-will-do-bjp-campaign-for-four-states-uddhav-thackeray-group-criticizes-news-update-today
uddhav-thackeray-criticized-shinde-fadnavis-government-over-barsu-refinery-project-news-update-today

मुंबई : ठाण्यात शिंदे गटाच्या (Shinde Group) काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एक महिला रोशनी शिंदे (Roshni shinde) यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 “…तर फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही”

“यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं.

 “फडणवीसांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावं, मंत्रीमंडळाच्या विस्तारात एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री असं पद निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं”, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.

नेमकं काय घडलं ठाण्यात?

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा दावा करत शिंदे गटाच्या काही महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना रविवारी समज देण्याचा प्रयत्न केला. हे ही चर्चा विकोपाला जाऊन त्यांच्यामध्ये धक्काबुक्की सुरू झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. यानंतर रोशनी शिंदे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची आज उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here