मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. अजित पवारांची प्रकृती चांगली आहे. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
अजित पवारांचे ट्विट?
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना राज्यातील प्रमुख नेते असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कोरोनाग्रस्त आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना काही दिवस संपर्क करता येणार नाही.