नवी दिल्ली : कलम 370 पुन्हा लागू करा यासाठी काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी एकत्र येण्याची. घोषणा केली. दरम्यान, काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे. (chidambaram-salutes-unity-kashmiri-parties-re-imposition-article-370) केंद्र सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या सहा काश्मिरी पक्षांना त्यांनी सॅल्यूट ठोकला आहे.
चिदंबरम यांनी एक ट्विट केले. ते म्हणाले की, कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी एकजूट झालेल्या मुख्य प्रवाहातील पक्षांमधील ऐक्य आणि हिंमतीला माझा सलाम. तुम्ही या मागणीसाठी ठाम राहा. स्वयंभू राष्ट्रवाद्यांना टीकेकडे लक्ष देऊ नका. जे इतिहास वाचत नाहीत. तर इतिहास नव्याने लिहिण्या प्रयत्न करत आहेत. त्यांचा विचार करु नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे.
घटनेमध्ये राज्यांसाठी काही विशेष तरतुदींचे अनेक उल्लेख आहेत. जर सरकार या विशेष उल्लेखांना विरोध करत असेल तर नागांच्या प्रश्नासारखे प्रश्न कसे सोडवता येतील. असाही सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.
या पक्षांनी कलम 370 च्या विरोधात जाहीरनामा तयार केला
पीडीपीच्या महेबूबा मुफ्ती, नँशनल कॉन्फ्रन्सचे फारख अब्दुल्ला, जेकेपीसीसीचे जीए मीर, माकपचे एम वाय तारिगामी, जेकेपीसीचे सज्जाद गनी लोन, जेकेएएनसीचे मुझ्झफर शाह यांचा समावेश आहे.
जम्मू काश्मीमरमधील शांतताप्रिय लोकांसाठी हा कसोटीचा काळ आहे. आम्ही सर्वजण घटनेनुसार जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी सामूहिकरीत्या लढण्यासाठी कटिबध्दतेचा पुनुरुच्चार करत आहोत. असंही या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.