काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या राणू मंडल याचं गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. त्यानंतर कच्चा बादाम या गाण्याची क्रेझ दिसून आली. या यादीत आता एका ट्रक ड्रायव्हरच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. मोहम्मद रफीचं गाणं गाऊन हा ट्रक ड्रायव्हर सोशल मीडीयाचा नवा हिरो ठरू लागला आहे. या ट्रक ड्रायव्हरचा अत्यंत सुरेल आवाज सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. तसंच त्याच्या आवाजाचंही प्रचंड कौतुक सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्ती एका ठिकाणी शांतपणे उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला पाहून कुणालाही वाटणार नाही की त्यांच्यामध्ये गाणं गाण्याचं टॅलेंट सुद्धा आहे. मधून आवाजाची जादू त्यांच्या सुरात असेल याची कल्पना सुद्धा येत नाही. या व्हिडीओमध्ये हे ट्रक ड्रायव्हर मोहम्मद रफीचे प्रसिद्ध गाणे ‘मुझे इश्क है तुझी से’ गाणं गाण्यास सुरुवात करतात.
View this post on Instagram
काही सेकंदात ते गाण्याचा संपूर्ण अनुभव कॅप्चर करतात आणि मधुर आवाजाची जा राणू दू पसरवतात. हा व्हिडीओ पाहताना काही वेळासाठी जणू काही प्रत्यक्ष मोहम्मद रफीच हे गाणं गात आहेत की काय असा भास होऊ लागतो. केवळ साधा एक ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीकडे गोड आवाजाचं टॅलेंट पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. त्याचा हा व्हिडीओ पाहून कोणालाही अगदी प्रसन्न वाटेल.
या ड्रक ड्रायव्हरचा हा व्हिडीओ विवेक शर्मा नावाच्या युजरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. विवेक शर्मा हे देखील स्वतः एक गायक आहेत. हा व्हिडीओ शेअऱ करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी या ट्रक ड्रायव्हरबाबत माहिती देताना लिहिले की, “कमलेश काका आयुष्यभर ट्रक ड्रायव्हर राहिले आहेत. पण ते एक कट्टर संगीतकार आणि आतून मोहम्मद रफीचे चाहते आहेत.
बरीच विनवणी केल्यानंतर त्यांनी हे गाणे गुणगुणले आहे. त्यांचा आवाज अनुभवा जो परिस्थितीमध्ये कुठेतरी हरवलेला आहे.” सर्व काही ठीक झाले तर अंकलला म्युझिक स्टुडिओत घेऊन गाणे रेकॉर्ड करणार असल्याची माहितीही विवेक शर्मा यांनी दिली आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण या ट्रक ड्रायव्हरच्या जादूई आवाजाचे फॅन बनले आहेत.