उभे राहून पाणी पिऊ नयेत, ‘हे’ आहेत धोके

Don't stand and drink water, these are the dangers
Don't stand and drink water, these are the dangers

बहुतांश लोक पाणी उभ्यानेच पितात. कारण सवयीचा परिणाम. आयुर्वेदानुसार उभ्याने पाणी प्यायल्यास अनेक आजार आपल्याला जखडतात. उभ्याने पाणी पिण्याची ही सवय आपल्याला कशी घातक ठरू शकते. जाणून घेऊयात.

सांधेदुखी

भविष्यात होणाऱ्या सांधेदुखीचे कारण उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीत दडलेले असू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यातील वंगणाचे संतुलन बिघडून जाते आणि सांध्यातील हे वंगण तिथेच सांध्यात साठून राहते.

उभे राहून पाणी प्यायल्याने वात प्रकृती वाढते आणि गुडघे दुखणे सुरू होते. ज्यांना गुडघे दुखीचा त्रास असेल त्यांनी बसूनच पाणी प्यावे. थोड्या दिवसात लगेच फरक पडेल.

मूत्रपिंडांचे आजार

मूत्रपिंडातून पाणी गाळले जाते. मात्र, उभे राहून पाणी प्यायल्यास मूत्रपिंड त्याचे हे काम नीट करू शकत नाही.

हेही वाचा l Airtel स्मार्टफोन खरेदीसाठी देणार लोन

शरीरातील पाणी न गाळताच वाहून जाते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मुत्राशय या दोन्हीमध्ये विषद्रव्ये तशीच राहतात. याचा परिणाम म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग होणे. तसेच मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here