ट्रक-कारची समोरासमोर धडक, एकाच कुटुंबातील 10 जण ठार!

gujarat-car-and-truck-accident-near-tarapur-anand-district-10-people-died-news-update
gujarat-car-and-truck-accident-near-tarapur-anand-district-10-people-died-news-update

आनंद (गुजरात): गुजरातमध्ये बुधवारी कार- ट्रकमध्ये एक भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला. यात 2 मुले आणि 2 महिलांचा समावेश आहे. अपघात आनंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर सकाळी 6:20 वाजता झाला.Gujarat-car-and-truck-accident-near-tarapur-anand-district-10-people-died-news-update

मिळालेल्या माहितीनुसार, कार हायवेवरुन खूप वेगाने जात होती. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या ट्रकवर कार आदळली. या भीषण अपघातात कारचा चुरा झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला.

मृतांची ओळख पटवून त्यांच्या नातलगांना सूचना देण्यात आली आहे. सर्व मृतदेहांना पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले आहेत. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा 

Sarkari Naukri : रक्षा मंत्रालय में 10वीं पास के लिए सरकारी नौकरियां

पॉजिटिव खबर: IIM पासआउट अंकिता ने अमेरिका की नौकरी छोड़ी; डेयरी फार्मिंग का बिजनेस शुरू किया, सालाना 90 लाख रुपए का टर्नओवर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here