झुरळांपासून सुटका करुन घेण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा

how to get rid of cockroaches in kitchen home remedies
how to get rid of cockroaches in kitchen home remedies

घरातील अस्वच्छ ठिकाणी बऱ्याच वेळा झुरळांचा वावर असतो. त्यांना मारण्यासाठी चपलेपासून अत्यंत महागड्या कीटकनाशकांपर्यंतचे उपाय योजले जातात. काहीजणं घरातील झुरळ घालवण्यासाठी पेस्टकंट्रोलही करता. आपल्याकडे दोन प्रकारची झुरळे मोठया प्रमाणावर आढळतात. काळ्या किंवा लाल रंगाची अमेरिकन झुरळे (पेरिप्लानेटा अमेरिकन) या झुरळांपासून सुटका करायची असेल तर हे घरगुती उपाय नक्कीच करुन पाहा.

<<घरात झुरळ फिरत असलेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर टाकावी. कडूलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र दर्पामुळे झुरळ लवकर मरतात. जर झुरळांपासून सुटका हवी असेल तर हे उपाय एकदा नक्की करुन पाहा.

<<घरात स्वच्छता ठेवावी.

<<तमालपत्राचा वास काहीसा उग्र असतो. त्यामुळे घरातील ज्या भागामध्ये झुरळांचा वावर जास्त आहे. त्या ठिकाणच्या कोपऱ्यांमध्ये तमालपत्रांची पानं चुरगळून ठेवावीत. ती हवेने उडू नयेत म्हणून एका पातळ कपड्यामध्येही तुम्ही बांधून ठेवू शकता.

<<चवीला तीक्ष्ण आणि तसाच वास असलेली लवंग जशी आजारपणात गुणकारी ठरते तशीच ती झुरळांना पळवून लावण्यासाठीही मदत करते. त्यामुळे झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवावीत.

<<बोरिक पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन हे मिश्रण एकत्र करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवावी. खासकरुन ज्या ठिकाणी अंधार आणि ओलावा आहे अशा जागेवर ही पावडर टाकावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here