Rakul preet singh l अभिनेत्री रकुल प्रीत सिंह कोरोना पॉझिटीव्ह

Rakul preet-singh-tests-coronavirus-positive Covid positive
Rakul preet-singh-tests-coronavirus-positive Covid positive

मुंबई l अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला Rakul preet singh कोरोनाची लागण झाली. संसर्ग झाला आहे. रकुलने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह Covid positive आल्याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जून कपूर, वरुण धवन, अभिनेत्री क्रिती सेनॉन, अभिनेता मनिष पॉल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे.

‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मला कोणताही त्रास होत नाही आणि मी सध्या आराम करत आहे. मी लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करेन’ असे रकुलने पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

पुढे ती म्हणाली, ‘माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करते की तुम्ही देखील करोना चाचणी करुन घ्या. तुम्हा सर्वांचे आभार आणि तुम्ही काळजी घ्या.’

हेही वाचा : मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैना, सुझान खानसहित ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून रकुल तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. या चित्रपटात ती अजय देवगण आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी रकुलने चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा : अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे मिनी इंडिया;पंतप्रधान मोदींकडून कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here