Royal Enfield Meteor 350 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

ऑल-न्यू मोटरसायकल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

https://freepressindia.in/us-election-president-election-mla-ncp-rohit-pawar-violence/
https://freepressindia.in/us-election-president-election-mla-ncp-rohit-pawar-violence/

रॉयल एनफील्डने Royal Enfield Meteor 350 भारतात लॉन्च केली. तिची किंमत 1.76 लाख रुपये एक्स शोरूम,चेन्नई आहे. ही एक क्रूझर मोटरसायकल आहे जी आरई थंडरबर्ड 350X ची जागा घेते.

चेन्नईतील मोटरसायकल उत्पादकाच्या मते,Royal Enfield Meteor 350 ही एक ऑल-न्यू मोटरसायकल आहे जी इतर आरई बाईकच्या तुलनेत वेगळ्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये युनिटऐवजी नवीन 350 cc इंजिन देण्यात आले आहे.

क्लासिक 350 आणि बुलेट सारख्या  इतर 350 cc बाईकसारखे आहे. या नवीन उपलब्धतेमुळे रॉयल एनफील्डला थंडरबर्ड्स आणि लाइटनिंग बाईक्सद्वारे तयार केलेला वारसा पुढे चालू ठेवण्याची इच्छा आहे. 

नवी Meteor 350 मॉर्डन क्लासिक मोटरसायकल आहे. ही मोटरसायकल फायरबॉल (Fireball), स्टेलर (Stellar) आणि सुपरनोव्हा (Supernova) या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. यासोबतच या गाड्या वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असणार आहेत. 

रॉयल एनफील्ड Meteor 350 ची डिझाईन

नव्या Meteor 350 मध्ये राऊंड हेडलॅम्प, टियरड्रॉप आकाराची पेट्रोल टँक, वेगवेगळ्या सीट्स, राऊंड टेल लाईट्स आणि मेकॅनिकल बिट्स असणार आहेत.

एलईडी डीआरएल, ब्लॅक आऊट मेकॅनिकल बिट्स, अॅलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक बाईकला एक मॉर्डन लूक देतात.

हेही वाचा l Us-president-election l “लोकशाही ज्या वाटेनं चालली ते पाहून भीती वाटते”

हाय क्वॉलिटीचे हँडलबार, फॉरवर्ड-सेट फुटपेग आणि 17 इंचाचा रियर व्हील तर 19 इंचाचा फ्रंट व्हील दिल्याने ही मोटरसायकल खूपच आरामदायक फिल देते. 

रॉयल एनफील्ड Meteor 350 चे खास वैशिष्ट्ये 

रॉयल एनफील्ड Meteor 350 चे फिचर्स हे इतर 350cc RE बाईक्सच्या तुलनेत खूपच चांगले आहेत. यामध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल देण्यात आला आहे जो अॅनलॉग स्पीडोमीटर आणि ट्रिप मीटर, ओडोमीटर, फ्युअल गेज, क्लॉक सारखे रिडआऊटसाठी डिजिटल डिस्प्लेचा समावेश आहे.

कन्सोलमध्ये गिअर पोजिशन इंडिकेटर आणि एबीएस लाईट्स देखील आहेत. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ सपोर्ट आहे. रायडर्स याचा वापर करुन आपला स्मार्टफोन इंस्ट्रूमेंट कन्सोल सोबत जोडू शकतात. रॉयल एनफील्डच्या या मोटरसायकलमध्ये यूएसबी (USB) पोर्ट सुद्धा देण्यात आला आहे.

रॉयल एनफील्ड Meteor 350ची किंमत

  1. Royal Enfield Meteor 350 Fireball: 1.76 लाख रुपये (एक्स शोरूम, चेन्नई)
  2. Royal Enfield Meteor 350 Stellar: 1.81 लाख रुपये (एक्स शोरूम, चेन्नई)
  3. Royal Enfield Meteor 350 Supernoava: 1.91 लाख रुपये (एक्स शोरूम, चेन्नई)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here