ATM Cash Withdrawal : एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत नवा बदल, जाणून घ्या

sbi-change-cash-withdrawal-process-at-atm-news-update-today
sbi-change-cash-withdrawal-process-at-atm-news-update-today

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आता एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. एसबीआयने एटीएममधून (SBI ATM) पैसे काढण्यासाठी आता ओटीपी सेवा सुरू केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हा मोठा बदल केला आहे. हे बदल लवकरच एसबीआयच्या सर्व एटीएमवर लागू होणार आहे.

एसबीआयच्या ग्राहकांना आता बॅंकेचे व्यवहार करताना तसेच एटीएममधून पैसे काढताना ओटीपी शेअर करावा लागेल, हा ओटीपी चार अंकी असणार आहे. त्यामुळे बॅंकेत नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला एटीएममधून पैसे काढताना सोबत ठेवावा लागेल.

फसवणुकीच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने नियमांमध्ये बदल केला आहे. एकाच वेळी १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक पैसे काढणाऱ्या ग्राहकांना आता ओटीपी देणे बंधनकारक असेल, असेही एसबीआयच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 जाणून घ्या प्रक्रिया

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढताना तुमच्या सोबत डेबिट कार्ड आणि मोबाईल असणे आवश्याक आहे. हा मोबाईल क्रमांक तुमच्या बॅंक खात्याशी जोडलेला असावा. पैसे काढण्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड मशीनमध्ये टाकावा लागेल. त्यानंतर पीन टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारल्या जाईन. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला हवी रक्कम टाकून व्यवहार करता येईन.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here