सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफने Tiger-Shroff त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ जुना असून यात तो ‘दस बहाने’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील Shraddha-kapoor पाहायला मिळत आहे. यात हे दोघंही नृत्याचा सराव करत आहेत.
अॅक्शन सीनसाठी अभिनेता टायगर श्रॉफ Tiger-Shroff ओळखला जातो. चाहत्यांमध्ये टायगरच्या दमदार अॅक्शन सीनसोबतच त्याच्या नृत्यकौशल्याचीही चर्चा होत असते.
सोशल मीडियावर टायगर श्रॉफचा Tiger-Shroff असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. टायगर श्रॉफ च्या डान्सचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.
टायगर लवकरच ‘हिरोपंती २’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.