
मुंबई: देसी जुगाड एक अशी युक्ती आहे, जी प्रत्येक समस्या सोडवू शकते. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो खूपच इंटरेस्टिंग आहे. तो एका ज्यूसच्या दुकानाचा असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. हे असं दुकान नाही, तर या दुकानात तुम्हाला स्वतः ज्यूस बनवून प्यावा लागेल.हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका ज्यूसच्या दुकानाचा आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की या ज्यूसच्या दुकानात नवीन काय आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, की हे ज्यूस शॉप काही कॉमन शॉप नाही, पण हे दुकान पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्हाला खात्री आहे, की तुम्ही हे ज्यूसचं दुकान याआधी क्वचितच पाहिलं असेल.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय. तुम्ही ग्रीनोबार नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सायकलच्या समोर लावलेल्या ब्लेंडरनं पूर्ण ताकदीनं सायकल चालवताना दिसतोय. तो वेगानं सायकल चालवायला लागताच, ब्लेंडर वेगानं काम करतो आणि आत ठेवलेल्या टरबुजाच्या तुकड्यांचा रस काढतो. तर हा व्हिडिओ 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. या व्हिडिओवर अनेक यूजर्स मजेशीप प्रतिक्रिया देत आहेत.