Huami कंपनीने भारतात रेट्रो स्टाइल स्मार्ट वॉच (retro style Smartwatch) ने Amazfit Neo लाँच केली आहे. या स्मार्टवॉचची किंमत फक्त २, ४९९ रुपये इतकी आहे. २८ दिवसांपर्यंत या स्मार्टवॉचची बॅटरी बॅकअप असेल असा दावा कंपनीने केला आहे.
भारतीय बाजारात स्मार्टवॉचचा ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागला आहे. आरोग्यविषयक तपशील मिळण्याच्या फायद्याखेरीज इतर अनेक वैशिष्टय़ांमुळे ‘वेअरेबल डिव्हाइसेस’च्या गटात ‘स्मार्टवॉच’ला सध्या जास्त मागणी आहे.
Amazfit Neo या स्मार्टवॉचमध्ये मोनोक्रोम ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये फिजिकल बटन्सही देण्यात आलं आहे जे नेव्हिगेशनसाठी वापरण्यात येऊ शकते. हे स्मार्ट वॉच 5ATM पर्यंत वॉटर रेजिस्टेंट आहे. या स्मार्टवॉचमध्ये पेडोमीटर, हार्टरेट मॉनिटर, सेडनटरी रिमाइंडर, स्लीप मॉनिटर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
पेडोमीटरद्वारे तुम्ही दिवसभरात किती पावले चालला, याचा तपशील नोंदवला जातो. ‘हार्टरेट मॉनिटर’ हा या स्मार्टवॉचचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ‘हार्टरेट मॉनिटर’मुळे तुमच्या ह्रदयचे ठोके मोजण्यात येतात. या स्मार्टवॉचमध्ये पर्सनल ऐक्टिविटी इंटेलिजेंस हे फिचरही देण्यात आलं आहे.
एक ऑक्टोबरपासून Amazfit Neo या स्मार्टवॉचची विक्री भारतात सुरु होणार आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, पेटीएम, टाटा क्लीकसह Amazfit संकेतस्थळावरुन हे स्मार्ट वॉच खरेदी करु शकता. ब्लॅक, ग्रीन आणि रेड अशा चार रंगामध्ये Amazfit Neo हे स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे.
पाहा : उर्वशी रौतालानं शेअर केला HOT VIDEO पाहा
या स्मार्टवॉचमध्ये डीप सलीम मॉनिटर, लाइट स्लीप मॉनिटरसारखे फिचर देण्यात आले आहेत. स्मार्टवॉचचं खास वैशिष्ट म्हणजे यामध्ये तीन स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यामध्ये वॉकिंग, रनिंग आणि सायकलिंगचा समावेश आहे. या स्मार्टवॉचा डिस्प्ले १.२ इंचाचा मोनोक्रोम डिस्प्ले आहे.
Amazfit Neo स्मार्टवॉचला Bluetooth 5.0 कनेक्टिविटी दिली आहे. यामुळे तुम्ही आयफोन किंवा स्मार्टाफोनला कनेक्ट करु शकता. या स्मार्टवॉचच्या उजवीकडे पारंपरिक घडय़ाळात असते त्यासारखी छोटी कळ आहे.
पाहा : video महिंद्राची नवी जीप लाँच click करा
ही कळ अर्थात बटण ‘मल्टिफंक्शनल’ असून त्याद्वारे स्मार्टवॉच चालू-बंद करणे, लॉक-अनलॉक करणे आदी गोष्टी करता येतात. वॉचच्या मागच्या बाजूस स्पीकर, चार्जिग पॉइंट आणि ‘हार्टबिट’ मोजण्यासाठीचा सेन्सर पुरवण्यात आला आहे.