मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा; औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार

मनोहर कुलकर्णीला ताबडतोब अटक करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. यासाठी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

Angry protests by Aurangabad City District Congress against Manohar Kulkarni alias Sambhaji Bhide
Angry protests by Aurangabad City District Congress against Manohar Kulkarni alias Sambhaji Bhide

औरंगाबाद: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल मनोहर कुलकर्णी उर्फ (संभाजी भिडे) याने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. त्याविरोधात औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती चौक येथे शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आले. 

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे व औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मनोहर कुलकर्णी याने अमरावती येथे एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले, ज्यांच्या त्यागामुळे बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या राष्ट्रपित्या बद्दल बोलणार्‍या मनोहर कुलकर्णीला ताबडतोब अटक करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

यावेळी  डॉ. कल्याण काळे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी आमदार अध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष युसूफ शेख, माजी मंत्री अनिल पटेल, निमेश पटेल, माजी आमदार नामदेवराव पवार, कांचनकुमार चाटे, भाऊसाहेब जगताप, रविंद्र काळे, भीमशक्तीचे दिनकर ओंकार, सय्यद अक्रम, ऍड.इक्बालसिंग गिल,  डॉ.अरुण शिरसाट, अनिस पटेल, सुरेंद्र साळुंखे, डॉ.नीलेश अंबेवाडीकर, डॉ.पवन डोंगरे,  संदीप बोरसे, महेंद्र रंडवाल, अनिल मालोदे, अशोक डोळस,  उमाकांत खोतकर, वरून पाथरीकर, संतोष भिंगारे, कैसर बाबा, रेखा राऊत, अनिता भंडारी, सविता म्हस्के, वैशाली तायडे, रेखा मुळे, शकुंतला साबळे,  मुदस्सीर अंसारी, विजय कांबळे, साहेबराव बनकर, डॉ. सरताज पठाण,  श्रीकृष्ण काकडे, सय्यद रुबिना, नदीम सौदागर, राहुल सावंत, एकनाथ त्रिभुवन, सय्यद फैयजुद्दीन, नदीम सौदागर, शेख राजू, चंद्रप्रभा ताई, असमत खान, असित सरवदे, आकाश रगडे सचिन सकट, आनंद मगरे, शुभम साळवे, जमिल खान, योगेश थोरात, प्रकाश सानप, कल्याण सर, उत्तम दणके, शफीक शहा, शफीक बागवान, मोहित जाधव, अलनकृत येवतेकर, प्रवीण केदार, सूर्यकांत गरड पाटील,  शिरीष चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ?; काँग्रेसचा संतप्त सवाल

हेही वाचा: Sambhaji Bhide : भिडेंना गांधीव्देष भोवला, अमरावतीत गुन्हा दाखल; देशभर आंदोलन सुरु

हेही वाचा: “संभाजी भिडे फक्त सोंगाड्या, हे सगळं टूलकिट…”, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा गंभीर आरोप!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here