Bank Holiday in December 2021: डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

Bank-holidays-closed-for-11-days-in-may-customers-should-plan-the-work-read-the-list-news-update
Bank-holidays-closed-for-11-days-in-may-customers-should-plan-the-work-read-the-list-news-update

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI Latest News) 2021 या वर्षातील बँक हॉलीडेची (RBI Bank Holiday List) यादी जारी करण्यात आली आहे. यानुसार, डिसेंबर महिन्यात (Bank Holiday in December 2021) सर्व खासगी आणि सरकारी बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात महत्त्वाची अशी ख्रिसमसची सुट्टी देखील असणार आहे. साप्ताहिक सुट्ट्या पकडून एकूण 12 सुट्ट्या पुढील महिन्यात असणार आहेत. हे सुट्टीचे दिवस लक्षात घेऊन आत्तापासूनच कामाचं नियोजन करावं.  कोणत्याही महत्त्वाच्या कामात अडथळा येणार नाही.

दरम्यान राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. उदा.- सेंट फ्रान्सिस झेवियर्स फीस्टनिमित्त 3 डिसेंबर रोजी गोव्यात बँक हॉलिडे असेल, परंतु देशाच्या इतर भागात सेवा उपलब्ध असतील. तर ख्रिसमस दिवशी देशाच्या प्रत्येक भागात बँका बंद राहतील. यामध्ये गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे.

नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

सुट्ट्यांची यादी?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल. आरबीआयच्या वेबसाइटवर डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची (Bank Holidays List December 2021) यादी तुम्हाला तपासता येईल. या 12 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे.

कधी आणि कोणत्या ठिकाणी असणार सुट्ट्या?

3 डिसेंबर- सेंट फ्रान्सिस झेवियर्स फीस्ट – गोवा

5 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)

11 डिसेंबर- दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

12 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)

18 डिसेंबर- यू सोसो थाम यांची पुण्यतिथी- शिलाँग

19 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)

24 डिसेंबर: ख्रिसमस सण (ख्रिसमस इव्ह) – आयझॉल, शिलाँग

25 डिसेंबर: ख्रिसमस – गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम

26 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)

27 डिसेंबर: ख्रिसमस सेलिब्रेशन – आयझॉल

30 डिसेंबर: यू कियांग नांगबाह – शिलाँग

31 डिसेंबर: नवीन वर्षाची संध्याकाळ – आयझॉल

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here