अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह

मी सध्या ठणठणीत काळजी करू नये,पटोलेंनी दिली ट्विटरवरून माहिती

nana-patole-new-congress-state-president
nana-patole-new-congress-state-president

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला तीन दिवस उरलेले असतानाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

 विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: दिली आहे. कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असंही ते म्हणाले.

“गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये,” असं नाना पटोले म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here