शिवसेनेची भन्नाट ऑफर; भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल मोफत मिळवा!

शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन, यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची केली घोषणा

shivsena-mla-vaibhav-naik-special-offer-on-the-occasion-of-shivsena-anniversary-free-petrol-for-bjp-members-news-update
shivsena-mla-vaibhav-naik-special-offer-on-the-occasion-of-shivsena-anniversary-free-petrol-for-bjp-members-news-update

कुडाळ: शिवसेनेचा Shivsena आज ५५ वा वर्धापनदिन Shivsena Anniversary आहे. यानिमित्ताने आमदार Mla वैभव नाईक Vaibhav Naik यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप Shivsena-Bjp यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी येथील आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलबरोबरच घरगुती गॅस सिलेंडरचे दर मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. अनेक जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभर पार गेले आहेत. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना आता दरवाढीचा बोजाही सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर  सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार आहे. तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी १ लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप समर्थकांमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपयात पेट्रोल
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जून रोजी डोंबिवलीत एका रुपयात पेट्रोलची जाहिरात एका रात्रीत सर्वदूर पसरली आणि तब्बल १०२ रुपयांत मिळणारे पेट्रोल एक रुपयात मिळणार असल्याने कल्याण-डोंबिवलीसह आजूबाजूच्या अगदी मुंबईतून नागरिकांनी रविवारी पहाटेपासून पेट्रोलपंपावर रांगा लावल्या. तब्बल दीड किमीपर्यंत लागलेली रांग पाहून आयोजकांची भंबेरी उडाली होती.

यानंतर घाईगडबडीत एका व्यक्तीला एक लिटर पेट्रोल आणि केवळ २५० दुचाकीचालकांनाच ते मिळणार असल्याचे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे पेट्रोलसाठी स्वत:चे दोन लिटर पेट्रोल जाळून आलेल्या नागरिकांची घोर निराशा झाली. या प्रकरणी वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत नागरिकांना आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे पोर्टलवरून केली आहे.

हेही वाचा : मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक; म्हणाला…

युवानेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील ग्रामीण विधानसभा संघटक योगेश म्हात्रे यांनी भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी एक रुपयात पेट्रोल देणार असल्याची जाहिरात केली होती. काही तासांत ही जाहिरात सर्वदूर पसरली. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत १०२ रुपये लिटर असलेले पेट्रोल एक रुपयात मिळणार म्हणून शहरातील आणि शहराबाहेरील दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी पहाटेपासून रांग लावली होती.

तब्बल १.५ किमीपर्यंत लांब रांगा लागल्याने चौकासह रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पेट्रोलसाठी जवळपास ७०० हून अधिक वाहनचालक रांगेत असलेले पाहून अचानक आयोजकांनी केवळ २५० दुचाकीचालकांना एक रुपयात केवळ एक लिटर पेट्रोल दिले जाणार असल्याचे बॅनर चिकटवले आणि पाच तासांपासून रांगेत उभे असलेल्या वाहनचालकांची घोर निराशा झाली. या प्रकरणी अनेकांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करत आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here