Booster Dose :१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत मोफत बुस्टर डोस

मनपाच्या ४७ आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू

Free booster dose for 5 lakh citizens of the aurangabad city news update today
Free booster dose for 5 lakh citizens of the aurangabad city news update today

औरंगाबाद : केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी औरंगाबाद महापालिकेने शुक्रवारपासून सुरू केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या शहरातील ५ लाख नागरिकांना मनपाच्या ४७ आरोग्य केंद्रात बुस्टर डोस दिला जाणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत बुस्टर डोस मोफत मिळणार आहे. अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

कोरोना संसर्गाचा होणारा तीव्र परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणाला मान्यता दिली. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोना प्रतिबंधक म्हणून प्रिकॉशन डोस (बुस्टर) आरोग्य कर्मचारी, प्रन्टलाईन वर्वर्स आणि ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत स्वरुपात आरोग्य केंद्रातून उपलब्ध करुन दिला. ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लस घेतली त्यांना बुस्टर डोस देखील कोविशिल्ड लसीचा दिला जात आहे.

कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. मात्र, १८ ते ५९ वयोगटातील सर्वसामान्य नागरिकांना बुस्टर डोससाठी पैसे मोजावे लागत होते. केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोरोनाचा बुस्टर डोस सर्व नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे  या संदर्भात माहिती देताना डॉ. पारस मंडलेचा म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा प्रिकॉशन डोस (बुस्टर) मनपाच्या आरोग्य केंद्रात देण्यास सुरुवात केली आहे.

१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना मोफत बुस्टर डोस…

४७ आरोग्य केंद्रातून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जाणार आहे. शहरात पहिला आणि दुसरा डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्या साधारणपणे ५ लाख नागरिकांना बुस्टर डोसचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन बुस्टर डोस घ्यावा. ३० सप्टेंबरपर्यंत बुस्टर डोस मोफत मिळणार आहे.

डॉ.पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here