Happy birthday Hrithik Roshan: हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझान खानने शेअर केला ‘हा’ खास व्हिडीओ

sussanne-khan-wishes-hrithik-roshan-on-his-birthday-calls-him-best-dad-video
sussanne-khan-wishes-hrithik-roshan-on-his-birthday-calls-him-best-dad-video

अभिनेता हृतिक रोशनचा Hrithik Roshan आज वाढदिवस birthday आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हृतिकच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर सुझान खानने sussanne khan एक व्हिडीओ शेअर करत हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तुझ्या आयुष्यात सर्वात सुंदर आणि आनंदी दिवस येवोत…

हा व्हिडीओ सुझान खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत हृतिक आणि त्याची दोन्ही मुलं दिसत आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रेय.

तुझ्या आयुष्यात सर्वात सुंदर आणि आनंदी दिवस येवोत आणि २०२१ हे वर्ष खूप चांगलं जावो अशी प्रार्थना करते”, अशा आशयाचं कॅप्शन सुझानने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

व्हिडीओला हॅशटॅग देते सुझानने हृतिकला ‘बेस्ट डॅड इन द वर्ल्ड’ म्हटलं आहे.

हृतिक आणि सुझानने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमधली मैत्री कायम चर्चेत राहिली आहे. लॉकडाउनदरम्यान सुझान हृतिकच्या घरी राहायला आली होती.

हेही पाहा : Viral Video : नोरा फतेही के ठुमकों ने हिलाया पूरा इंटरनेट

आपल्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुझानने सांगितलं आणि तिच्या या निर्णयाचं हृतिकने मनापासून स्वागत केलं.

पाहा फोटो: अभिनेत्री सोनलचा पाहा बोल्ड अंदाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here