शेगाव l श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त Shri Sant Gajanan Maharaj Shegaon sansthan Trustee शिवशंकर भाऊ पाटील Shivshankar Bhau Patil Passed Away यांचे आज (बुधवार) 4 ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे त्यांची प्राणज्योत मालवली. तर, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असं आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आलेलं आहे.
मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र, त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितलं होतं. त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली उपाचार सुरू होते.
ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड
“शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संस्थानच्या सेवाभावी कार्याच्या विस्तारामध्ये त्यांची भूमिका नेहमी स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
हेही वाचा
Delhi Cantt Rape Murder Case l “राहुल गांधी न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असेन”
संजय राऊतांनी राज्यपालांना दिला ‘हा’ इशारा,म्हणाले…