sushant sing case : …आता सुशांतचं कुटुंब सीबीआय CBI तपासावर नाराज, सत्य बाहेर येणार नाही!

सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांचा दावा

Now Sushant's family is upset over CBI probe, truth will not come out!
सुशांतच्या कुटुंब तपासावर नाराजNow Sushant's family is upset over CBI probe, truth will not come out!

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant sing Rajput) याच्या आत्महत्येचा तपास सध्या सीबीआय (CBI) करत आहे. मात्र, सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांपाठोपाठ सीबीआयच्या तपासावरही नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतचे कुटुंबीय तपासावर नाराज असल्याचा दावा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह (vikas singh ) यांनी  केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारण सुरु आहे. सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेतला होता. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीवरून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं होतं. सध्या सीबीआय प्रकरणाचा तपास करत आहे.

तपासातून सत्य बाहेर येणार नाही

दरम्यान, सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सुशांतचे कुटुंबीय सीबीआयच्या तपासावर नाराज असल्याचं म्हटलं आहे. “ज्या प्रकारे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून सुशांतच्या कुटुंबीयांना असं वाटतंय की यातून सत्य बाहेर येणार नाही.

एनसीबीनंही मुंबई पोलिसांसारखच सुरू केलं आहे. एका एका कलाकाराला बोलवलं जात आहे. हा सगळा तपास मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणेच सुरू आहे. यात सुशांतचं प्रकरण पाठीमागे पडलं आहे,” असं विकास सिंह म्हणाले.

सगळं लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रित केलं गेलं

“सुशांतच्या कुटुंबीयांना वाटत की, या प्रकरणाचा तपास वेगळा दिशेनं व्हायला हवा. यात सगळं लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रित केलं गेलं आहे. एम्सच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू नाहीये. या तपासावर मी नाखुश आहे.

वाचा : सुशांत प्रकरण नक्की आहे तरी काय वाचा सविस्तर क्लिक CLICK करा

हे प्रकरण कोणत्या दिशेनं जात आहे माहिती नाही. आम्ही हताश आहोत. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आलं, यासंदर्भात सीबीआयनं एकदाही माहिती दिलेली नाही,” असं विकास सिंह म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here